gandhinagarmetro.com
  • Home
  • GUJARAT
  • INDIA
  • Business
  • National
  • Culture
  • CINEMA
  • Lifestyle
  • Sports
No Result
View All Result
  • Home
  • GUJARAT
  • INDIA
  • Business
  • National
  • Culture
  • CINEMA
  • Lifestyle
  • Sports
No Result
View All Result
gandhinagarmetro.com
No Result
View All Result
Home GUJARAT

भरत जाधव आणि पुष्कर श्रोत्री न्यायाच्या रणधुमाळीत आमने-सामने ! मराठी Zee 5 वर 16 ऑक्टोबर रोजी कोण यश…

G METRO NEWS by G METRO NEWS
October 9, 2026
in GUJARAT
0 0
0
भरत जाधव आणि पुष्कर श्रोत्री न्यायाच्या रणधुमाळीत आमने-सामने ! मराठी Zee 5 वर 16 ऑक्टोबर रोजी कोण यश…
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

एखाद्या चक्रात अडकल्यावर मुक्तीचा शोध घेणाऱ्या व्यक्तीला त्याच व्यवस्थेचा सामना करण्यास भाग पाडले जाते; ज्यावरचा विश्वास त्याने एकदा गमावला होता. अशास्थितीत नेमके काय घडते? आनंद दिलीप गोखले लिखित आणि दिग्दर्शित; मंजिरी सुबोध भावे यांच्या कान्हाज् मॅजिकची निर्मिती असलेली कोण यशवंत पानसरे? म्हणजे न्याय, सत्ता आणि सत्याशी संबंधित गुंतागुंतीच्या छेदनबिंदूचा शोध घेणारा हा एक खिळवून ठेवणारा कोर्टरूम ड्रामा तसेच एक तपास-आधारित थरारपट आहे.

समीक्षकांनी गौरवलेल्या तमिळ Zee5 सिरीजच्या ‘सत्तामुम नीधियम’ वरून रुपांतर केलेली ही मालिका एका व्यक्तीचा अपराधीभाव आणि आत्म-संशयावरुन धैर्य तसेच सुटकेच्या खोलवरील वैयक्तिक प्रवासाचा मागोवा घेताना आव्हानात्मक व्यवस्थेच्या परिणामांचा अभ्यास करते. भरत जाधव, शिवानी रांगोळे, पुष्कर श्रोत्री, शर्वरी जमेनीस, उज्ज्वला जोग, विद्याधर जोशी, मिलिंद फाटक यांच्या सहज अदाकारीने नटलेल्या ‘कोण यशवंत पानसरे?’ चा प्रीमियर दिनांक 16 ऑक्टोबर 2026 रोजी मराठी Zee 5 वर होणार आहे.

कोण यशवंत पानसरे ही मालिका नेमकी कशाबद्दल भाष्य करते?

एकेकाळी एक प्रबळ वकील असलेले यशवंत पानसरे हे आयुष्यात उद्ध्वस्त करणाऱ्या अपयशापायी नोटरी म्हणून काम करत असतात.ज्यामुळे ते अपराधीपणा आणि आत्म-संशयाच्या गर्तेत अडकले आहेत. त्यातच बेपत्ता झालेल्या अलकाचे वृद्ध वडील, सदाशिव मापारी हे मुलीचा छडा लावण्यात कुचकामी ठरलेल्या यंत्रणेवर आरोप करून न्यायालयाच्या बाहेर स्वतःला पेटवून घेतात. या घटनेमुळे यशवंत पानसरेंच्या आयुष्याला एक अनपेक्षित वळण लागते. या हताश कृतीमुळे हादरून गेलेले पानसरे न्यायालयात जनहित याचिका दाखल करतात. ज्यामध्ये पारंपरिक व्यावसायिक निकषांना आव्हान देणारी निर्भय तरुण वकील जान्हवी त्यांच्यासोबत लढाईत सामील होते.

“कोण यशवंत पानसरे?” हटके का ठरते!
तपासाशी निगडीत कोर्टरूम नाट्य- अलका बेपत्ता होण्यामागील पदर उलगडत असताना कथा कोर्टाच्या पलीकडे जाते. एक शक्तिशाली सुटका चक्रः पानसरे यांचा न्यायाचा पाठपुरावा हा त्यांच्या भूतकाळाला सामोरे जाण्याचा आणि वकील म्हणून त्यांची ओळख पुन्हा सिद्ध करण्याचा एक खोलवरील वैयक्तिक प्रवास बनतो. न्याय विरुद्ध सत्ता: ही मालिका उत्तरे शोधणारी व्यक्ती आणि शक्तिशाली संस्थात्मक त्याचप्रमाणे राजकीय शक्ती यांच्यातील संघर्षाचा शोध घेते. बदलत जाणारे प्रकरण: जनहित याचिकेचे रूपांतर हेबिअस कॉर्पस सुनावणीमध्ये होत असताना, प्रत्येक प्रकटीकरण प्रेक्षकांना सत्य परिस्थिती समजून घेण्याला आव्हान देते. संस्थात्मक अपयशाची किंमत मनुष्य चुकवतो: जेव्हा न्यायाच्या प्रतीक्षेत असलेली हतबल याचिका दुर्लक्षित राहते आणि एक माणूस व्यवस्थेला आव्हान देण्याचा निर्णय घेतो तेव्हा नेमके काय घडते याचा शोध कथानक मुळाशी जाऊन घेते. यापूर्वी कधीही न पाहिलेल्या थक्क करणाऱ्या दमदार स्वरुपाच्या यशवंत पानसरे’च्या भूमिकेत भरत जाधव यांनी व्यक्तिरेखेची खोली जाणून मोठ्या ताकदीने पात्राभोवतीची असुरक्षितता रंगवलेली पाहायला मिळते.

वेब शो बद्दल बोलताना अभिनेता भरत जाधव म्हणाले “यशवंत पानसरे” हे एक असे पात्र आहे जे त्या व्यक्तिरेखेच्या पदरामुळे मला निराळे वाटले. तो एक असा माणूस आहे ज्याने अपयश अनुभवले आहे. स्वत:च्या भूतकाळाचे ओझे उचलले आहे आणि स्वतःवरील विश्वास जवळजवळ गमावला आहे. त्याच्या प्रवासाला मनोरंजक बनवणारी गोष्ट म्हणजे तो अचानक नायक होत नाही; त्याला लढाईत पुन्हा ढकलले जाते कारण त्याच्या समोर जे घडते त्याकडे तो दुर्लक्ष करू शकत नाही. जेव्हा तो अलका बेपत्ता झाल्याचा तपास सुरू करतो, तेव्हा त्याला केवळ व्यवस्थेचाच नव्हे तर स्वतःच्या भीतीचा आणि अपराधीपणाचा देखील सामना करावा लागतो. कोर्टरूम एक अशी जागा बनते जिथे त्याला हळूहळू स्वत:चा आवाज पुन्हा सापडतो. तो सर्व गुंत्यातून स्वत:च्या मुक्तीचा मार्ग शोधतो. मला विश्वास आहे की प्रेक्षकांना ‘पानसरे’च्या प्रवासाची भावनिक बाजू आपलीशी वाटेल. ते गूढ आणि कथेत हरवतील. न्याय, सत्य तसेच संस्थात्मक जबाबदारीबद्दलचे प्रश्न त्यांच्या मनात उपस्थित होतील.

अभिनेता पुष्कर श्रोत्री म्हणाला “मला सारडाकडे ज्या गोष्टीने आकर्षित केले ती गोष्ट म्हणजे तो निव्वळ कोर्टरूममध्ये पानसरेसमोर उभा राहणारा माणूस नाही. तो एक असा वकील आहे. ज्याला व्यवस्था, तिची कार्यपद्धती आणि त्यासोबत येणारी शक्ती समजते. ज्यामुळे पानसरेशी असलेल्या त्याच्या संघर्षाला अनेक पदर फुटतात. त्यांच्यातील न्यायालयीन देवाणघेवाण केवळ युक्तिवाद जिंकण्याबद्दल नसून कायदा, न्याय आणि व्यवस्थेवरील दोन अतिशय भिन्न दृष्टीकोन प्रतिबिंबित करतात. सारडा साकरण्यासाठी विशिष्ट संयमाची आवश्यकता होती. कारण त्याच्यातील अधिकार दर्शवायचा होता. नाट्यकलेपेक्षा त्या भूमिकेत असलेला संयम अनुभवातून येतो. कोण यशवंत पानसरे? न्यायाविषयी काही अतिशय संबंधित प्रश्नांचा शोध घेतो. जेव्हा महत्त्वपूर्ण संस्था लोकांची सेवा करण्यासाठी असतात, त्या लोकांकरिता काम करताना अपयशी ठरतात तेव्हा काय घडते आणि त्या प्रश्नांचा उलगडा प्रेक्षकांना कधी होतो याची मी वाट पाहत आहे.”

अभिनेत्री शिवानी रांगोळे म्हणाली, “जान्हवी ही अशी व्यक्ती आहे जी वयाचा, अनुभवाचा किंवा एखाद्या गोष्टी करण्याच्या प्रस्थापित पद्धतींचा स्वीकार करण्यास नकार देते. आपण किती दूर जाऊ शकतो हे स्वत: ठरवते. मला तिच्याबद्दल सर्वात मनोरंजक वाटणारी बाब म्हणजे तिची निर्भयता! जी तिच्या दृढनिश्चयातून येते – इतरांनी आदर्श म्हणून काय स्वीकारले आहे यावर प्रश्न विचारायला ती तयार असते. पानसरे यांच्याशी तिचा संबंध देखील कथेचा एक महत्त्वाचा भाग बनतो, कारण ते वेगवेगळ्या टप्प्यांतून या प्रकरणाकडे जात असताना, ते दोघेही आपापल्या पद्धतीने व्यवस्थेला आव्हान देतात. भरत जाधव आणि पुष्कर श्रोत्री यांच्यासोबत कोर्टरूम ड्रामा आणि तपासादरम्यानच्या कथेवर काम करणे हा एक अद्भुत शिकण्याचा अनुभव होता. ‘कोण यशवंत पानसरे’ माझ्याकरिता खास का आहे? तर ती प्रेक्षकांसोबत राहील. कारण धैर्य, सत्य आणि न्यायाचा शोध हा कथेचा आत्मा आहे.”

कोण यशवंत पानसरे? 16 ऑक्टोबर 2026 रोजी मराठी Zee 5 वर बघायला विसरू नका !

G METRO NEWS

G METRO NEWS

Related Posts

Audience and Critics Hail Debut Director Haris Imtiyaz Khan as the “Biggest Achievement” of Kaali Kh…
GUJARAT

Audience and Critics Hail Debut Director Haris Imtiyaz Khan as the “Biggest Achievement” of Kaali Kh…

November 23, 2026
Amruta’s Saree Brand ‘Amulya By Amruta’ Chosen For The Buzzing Movie – Shraddha Kapoor’s Eetha !
GUJARAT

Amruta’s Saree Brand ‘Amulya By Amruta’ Chosen For The Buzzing Movie – Shraddha Kapoor’s Eetha !

November 23, 2026
Pitch To Get Rich Season 2 teaser crosses 30 million views in 24 hours
GUJARAT

Pitch To Get Rich Season 2 teaser crosses 30 million views in 24 hours

November 23, 2026
Next Post
જામસાહેબ મેમોરિયલ યુથ એક્સચેન્જ પ્રોગ્રામ–૨૦૨૬ અંતર્ગત પોલિશ યુવા પ્રતિનિધિમંડળની સૈનિક સ્કૂલ બાલાચડ…

જામસાહેબ મેમોરિયલ યુથ એક્સચેન્જ પ્રોગ્રામ–૨૦૨૬ અંતર્ગત પોલિશ યુવા પ્રતિનિધિમંડળની સૈનિક સ્કૂલ બાલાચડ...

DRM ભાવનગરની Nirma Limitedના પ્રતિનિધિઓ સાથે બેઠક, મહુવામાં સિમેન્ટ લોડિંગ શરૂ કરવા અને માલ પરિવહન વ…

DRM ભાવનગરની Nirma Limitedના પ્રતિનિધિઓ સાથે બેઠક, મહુવામાં સિમેન્ટ લોડિંગ શરૂ કરવા અને માલ પરિવહન વ...

પાલીતાણા તથા જેસર પંથકમાં 51 કિલોમીટરની 18 ગામોમાં સુપોષણ જ્યોત પદયાત્રામાં જોડાવા લોકો ઉત્સુક

પાલીતાણા તથા જેસર પંથકમાં 51 કિલોમીટરની 18 ગામોમાં સુપોષણ જ્યોત પદયાત્રામાં જોડાવા લોકો ઉત્સુક

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow Us

Recommended

‘જય’ના આપઘાત પાછળ કોલેજ સ્ટાફનો માનસિક ત્રાસ જવાબદાર, આરોપીઓને છાવરવાનો પ્રયાસ : પરિવાર | College st…

‘જય’ના આપઘાત પાછળ કોલેજ સ્ટાફનો માનસિક ત્રાસ જવાબદાર, આરોપીઓને છાવરવાનો પ્રયાસ : પરિવાર | College st…

10 months ago
ભારત સરકારે 16 પાકિસ્તાની યુટયુબ ચેનલોને બ્લોક કરી | Indian government blocks 16 Pakistani YouTube c…

ભારત સરકારે 16 પાકિસ્તાની યુટયુબ ચેનલોને બ્લોક કરી | Indian government blocks 16 Pakistani YouTube c…

2 years ago
વિશ્વામિત્રી નદીમાં પાણીનું લેવલ ૨૨ ફૂટ સુધી જાળવી રાખવામાં આવશે | The water level in the Vishwamitr…

વિશ્વામિત્રી નદીમાં પાણીનું લેવલ ૨૨ ફૂટ સુધી જાળવી રાખવામાં આવશે | The water level in the Vishwamitr…

1 year ago
અમદાવાદમાં આજે સાંજથી આવતીકાલ સુધી પાણીકાપ, આ વિસ્તારોમાં થશે સૌથી વધુ અસર | Ahmedabad to Face 8 Hou…

અમદાવાદમાં આજે સાંજથી આવતીકાલ સુધી પાણીકાપ, આ વિસ્તારોમાં થશે સૌથી વધુ અસર | Ahmedabad to Face 8 Hou…

10 months ago

Instagram

    Please install/update and activate JNews Instagram plugin.

Categories

  • Business
  • CINEMA
  • Culture
  • GUJARAT
  • INDIA
  • Lifestyle
  • National
  • Sports
  • Travel
  • Uncategorized
  • World

Topics

2018 FIFA World Cup 2018 League America apples application Asian Games 2018 Balinese Culture Bali United Budget Travel car Chopper Bike construction management fiscal forecast GANDHINAGAR METRO NEWS increases Istana Negara maintenance management Market Stories National Exam points price rises Sensex society management system software Visit Bali visitor tracking year આ કમ કમતમ કરન છ થઈ પઈનટ ફચ ફયદ રહય વધન વધર વધરન સધ સનસકસ સરકરન..

  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Call us: +91 99137 20273

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • INDIA
  • GUJARAT
  • Business
  • Culture
  • National
  • Sports
  • Lifestyle
  • Travel
  • CINEMA

© 2025 Gandhinagar Metro News